Good Thoughts

   
                            एक तालुका एक शाळा

      प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत विविध प्रयोग महाराष्ट्रात सुरु आहे.यापूर्वी सुद्धा सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करण्यात आले.पण पाहिजे तशी गुणवत्ता आपण प्राप्त करू शकलो नाही,याचे खरे कारण आहे,आपण फक्त जखमझाल्यावर औषध लावत बसलो मात्र कुणी हा विचारच केला  नाही की जखम झाल्यावर औषध लावण्यापेक्षा जखम होऊच न देणे यासाठी उपायोजना केल्या पाहिजे.गुणवत्ता विकास 100℅करणे यासाठी उपाय आहे 'एक तालुका एक शाळा 'याची ठळक वैशिष्ट्ये .
    1) जिल्हातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शाळा राहील.
    2) शाळेमध्ये संपूर्ण ग्रामीण भागातील 6 ते 14 वयोगटातील मुले शिक्षण           घेतिल.
    3) शाळेतील शिक्षण इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत राहील.
    4)शाळा निवासी राहील .सर्वच स्तरातील मुले या शाळेत शिक्षण घेतील.
    5)सर्वच मुलांना मोफत शिक्षण राहील.
    6)सर्वच शिक्षक निवासी राहतील.
    7)या ठिकाणी भव्य क्रीडांगण ,आधुनिक विविध प्रयोगशाळा तसेच कला कार्यानुभव शिक्षणासाठी विशेष व्यवस्था राहील.
    8)सर्वच विद्यार्थ्यांनसाठी भोजन सभागृह.
    9)गट शिक्षणाधिकारी याचे कार्यालय येथेच राहील.
   10) पालक वर्षातून दोन वेळा विद्याथ्या'ना घरी नेऊ शकेल.
   11)प्रशासकीय सर्वच माहिती येथील कार्यालयात उपलब्ध राहतील व शासनाला सहज प्राप्त होईल.
   12)सर्वच माध्यमनिहाय शिक्षणाची सोय.
     एक तालुका एक शाळेसाठी येणार खर्च कसा भागवावा.

   1) सर्वच गावातील सर्वच शाळा बंद करून ती संपत्ती विकून प्राप्त निधी.
   2)एकाच ठिकाणी सर्वच शिक्षक येणार असल्यामुळे कमी पटसंख्यावरील शाळेच्या शिक्षकांचा प्रश्न सुटेल. शिक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्या वेतनावरील खर्च वाचेल.तो याठिकाणी कामी येईल .
   3) या आदर्श योजनांसाठी जागतिक बँकेकडून कर्ज घेता येईल.
   4) ही योजना समाजातील सर्वच घटकातील मुलांसाठी समानतेची भावना निर्माण करणारी असल्यामुळे थोडा शिक्षण कर आकारणी करता येईल.
   5)समाजातील दानशूर व्यक्ती कडून निधी गोळा करता येईल.
    6) श्रीमंत घरच्या विद्यार्थ्याच्या पालकांकडून काही प्रमाणात वार्षिक निधी जमा करता येईल.

    एक तालुका एक शाळेचे फायदे :

1)सर्वच विद्यार्थी एकाच ठिकाणी शिकत असल्यामुळे समानतेची भावना निर्माण होईल.
2)मिड डे मिल योजना एकाच ठिकाणी .
3) विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीनुसार वर्ग निहाय शिक्षणाची सोय.
4)शासनाला सर्वच माहिती एका ठिकाणी प्राप्त होईल.
5)सर्वच शिक्षकांच्या घरभाडे खर्च कमी होईल तो शासनाला द्यावा लागणार नाही तसेच शिक्षक परिवाराची भोजन व्यवस्था या ठिकाणी होणार असल्यामुळे ते पैसे वसूल करता येईल.
6)शिक्षकांच्या वेतनावरील खर्च वाचेल.
7)विद्यार्थ्यांची गुणवत्ता 100 ℅ होण्यास मदत मिळेल.
8)शासनाचे प्रभावी नियंत्रण राहील.
9)शाळाबाह्य विद्यार्थी समस्या निकाली निघेल.
10)खाजगी काँनवेनट शाळेवरील लोकांचा खर्च बंद होईल.

    एक तालुका एक शाळा योजना कशी राबवावी.

1)सुरुवातीला काही जिल्ह्यातील काही तालुक्यात ही योजना राबविण्यात यावी.
2)हळूहळू तेथील यश पाहून संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना राबवावी.
3)संपूर्णपणे हि योजना सरकारी नियंत्रणात चालवावी.
4)शिक्षणतज्ञाच्या मार्गदर्शनात व समिती स्थापन करून नियंत्रण ठेवावे.
5)राजकीय लोक,सर्वच कर्मचारी ,व समाजातिल सर्वच घटकातील मुलांचा या मध्ये सक्तीने प्रवेश करून वर्ग निहाय भरती करण्यात यावी.
6)विद्यार्थी क्षमता व रुची पाहून शिक्षणाची सोय करावी.
      या योजनेवर विचार करून प्रयोग करून पाहावयास हरकत नाही असे मला वाटते.ही कल्पना आपण समोर ठेवत आहे.यात काही त्रुटी असू शकतात त्या दूर करता येईल,योजना नवोदय विद्यालयाचे मोठे स्वरूप आहे. पहा पटत असेल तर विचार व्हावा.

        """"""""""""""""""सुधीर पं. भोयर मो.क्र.9860461929 """""""""""""""
        Email : sudhirbhoyar1997@gmail.com

No comments:

Post a Comment